Dailyhunt
पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न.

पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न.

पुणे : इयत्ता अकरावीत शिकत असलेल्या मुलीवर एका युवकाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. युवक हल्ला करायला आला असता नागरिकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात महेश सिद्धप्पा भंडारी आणि त्याच्यासोबत असलेल्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय?

महेश आणि संबंधित मुलगी हे दोघे ही एकमेकांना ओळखतात. मुलगी व तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून जात होत्या. यादरम्यान महेश व त्याचा मित्र येथे आले. महेशकडे कोयता होता त्याने या वेळी झालेल्या वादातून त्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी हे पाहताच आरडा ओरड केली आणि या तरुणांनी तिथून पळ काढला. या मुलीकडून अद्याप पोलिसात तक्रार देण्यात आलेली नसली तरी सुद्धा पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलिस चौकीजवळ एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करण्याचे प्रयत्न झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील कोयता हल्लेखोर आरोपीला जामीन मंजूर…

एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

धक्कादायक! चुलत्याने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म…

The post पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka