Dailyhunt
पुणे! दोन युवा शिवभक्तांवर मध्यरात्रीच्या सुमारास काळाने घातली झडप.

पुणे! दोन युवा शिवभक्तांवर मध्यरात्रीच्या सुमारास काळाने घातली झडप.

पुणे : शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडल्यामुळे दोन शिवभक्तांचा मावळमध्ये मृत्यू झाला आहे. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या शिवभक्तांची नावे आहेत.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

महाराष्ट्र तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (शुक्रवार) जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या लाडक्या राजाची शिवज्योत विसापूर किल्ल्यावरून मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात घेऊन गावाकडे निघालेल्या दोन युवा शिवभक्तांवर काळाने झडप घातली. भरधाव कारने दिलेल्या भीषण धडकेत या दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण मावळात शोककळा पसरली आहे.

दोघेही शिवभक्त विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन स्वतःच्या गावी, म्हणजे शिंदेवाडीला पायी निघाले होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हे दोघे ज्योत घेऊन मार्गस्थ होते. त्याचवेळी, विरुद्ध दिशेने आलेल्या एका भरधाव कारने नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक भेदले आणि थेट या शिवभक्तांना चिरडले. हा आघात इतका भीषण होता की, ओंकार आणि दर्शन यांचा जागीच मृत्यू झाला.

‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत निघाले होते, तो आनंद काही क्षणातच दुर्घटनेत बदलला. हातातली शिवज्योत घेऊन गावाकडे पोहचण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. या दुर्घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, मावळचे सुपुत्र गमावल्याचे दु:ख संपूर्ण गावाला झाले आहे. पोलिसांकडून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित कारचालकावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पुण्यात शिवजंयतीच्या मिरवणुकांसाठी वाहतुकीत बदल…
आज राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे. यानिमित्त पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुण्यातील अनेक भागात मिरवणुका असल्या कारणाने लक्ष्मी रोड, नेहरू रोड, शिवाजी रस्ता, बाजीराव रोड या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग कोणते…
* जिजामाता चौकातून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौक- जंगली महाराज रोड खंडोजीबाबा चौ- टिळक चौ- टिळक रोड मार्गे वळविण्यात येईल.
* दारुवाला पुलाकडून फडके हौद चौक व जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारुवाला पुल चौकातूनच पर्यायी मार्गाने सोडण्यात येईल. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक केळकर रोडमार्गे वळविण्यात येईल.
* मिरवणूक लक्ष्मी रोडवर असताना सोन्या मारुती चौकापर्यंत लक्ष्मी रोडवरील वाहने संत कबीर चौकाकडून वळविण्यात येतील.
* पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणारी वाहने टिळक रोड- अलका टॉकीज चौ- एफ.सी. रोडमार्गे जातील.
* मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौक व बाजीराव रोडकडे जाणारी वाहतूक बंद करून ती केळकर रोडकडे वळविण्यात येईल.
* गाडगीळ पुतळा परिसरात मिरवणूक असताना वाहने सावरकर भवन पुल - बालगंधर्व चौक किंवा टकले हवेली मार्गे वळविण्यात येतील.
* शनिवारवाड्याकडे जाणारी वाहतूक कॉसमॉस बँक जंक्शन- टिळक पूल- मनपा किंवा टकले हवेलीमार्गे सोडण्यात येईल.

Video! पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांची विशेष मुलाखत…

पुणे! शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी; तोंडावर मारला ठोसा अन्…

पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka