Dailyhunt
पुणे! शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी; तोंडावर मारला ठोसा अन्.

पुणे! शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलांमध्ये हाणामारी; तोंडावर मारला ठोसा अन्.

पुणे : पुणे जिल्हा न्यायालयाच्या (शिवाजीनगर) आवारात दोन महिला वकिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. न्यायालयीन प्रकरणं मिळवण्याच्या वादातून हा प्रकार घडला असून, यामध्ये एक महिला वकील (वय ४२) गंभीर जखमी झाली आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी महिला वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महिला वकील गेल्या दीड वर्षांपासून मोटर वाहन न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. त्यांना आरोपी वकिलाच्या तुलनेत जास्त प्रकरणे (केसेस) मिळत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात आधीपासूनच धुसफूस सुरू होती. याच वैमनस्यातून न्यायालयात वाद झाला. दुपारच्या सुमारास फिर्यादी वकील न्यायालयाच्या बाहेर पडत असताना आरोपी महिलेने त्यांना गाठलं आणि शिवीगाळ करत तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर दोघींमध्ये झटापट सुरू झाली. याच दरम्यान आरोपी वकिलानं हातातील एका अणकुचीदार वस्तूनं फिर्यादीच्या डोक्यावर प्रहार केला. जखम खोल असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि जखमी वकील महिलेला चक्कर आली. उपस्थित वकिलांनी धाव घेत जखमी महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मारहाण आणि फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं आयुष्य…

पुणे! न्यायालयातून पलायन करणारा सराईत गुन्हेगार शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात…

न्यायालयाने सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्याला ठोठावला दंड…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka