पुणे : पुणे शहरातील हडपसरमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटसमोर थेट जिवंत बॉम्ब ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. रुग्णांच्या आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.
रूग्णालयात बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणात आरोपी शिवाजी राठोड याच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीला रुग्णालयातून उपचार घेण्यासाठी सात लाख रूपयांचा अंदाज देण्यात आला होता. मात्र, एवढे पैसे नसल्याने डॉक्टरकडूनच पैसे उकळण्यासाठी बॉम्ब सदृश्य वस्तू ठेऊन खंडणी मागण्याचा त्याचा प्रयत्न होता. दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. पोलिसांनी बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणाऱ्यांचा तपास सुरू केला आणि दरम्यानच्या काळात ही वस्तू छोटा स्फोट घडवून निकामी करण्यात आली. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपी निश्चित केला. मूळचा सोलापूरचा असलेला हा आरोपी गुन्हा करून पळून गेला होता.
पोलिसांनी तपास पुढे नेला असता काही दुकानांमध्ये युपीआयने पैसे दिल्याने त्याचा नंबर पोलिसांना मिळाला त्यावरून त्याचा माग काढत असताना दोन वेळा तो पोलिसांना चकवा देऊन रेल्वेत बसून हावड्याला पळून चालला होता. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत नागपूरला त्याला अटक केली आहे.
हडपसर बॉम्ब प्रकरणी आरोपीने अवघ्या 400 रुपयात बॉम्ब सदृश वस्तू बनवली असल्याची पोलिसांची माहिती आहे. यात डिजिटल घड्याळ, चार पाईप, सेलो टेप, दोन वायर काळे आणि लाल, स्फोटक काही पदार्थ नव्हता असा बॉम्ब बनवला. आरोपीच्या घरी 2 किलो गांजा मिळून आला आहे, त्याचा तपास ही केला जात आहे. आरोपी नागपूर मधून पुढे हावडा मार्गे नेपाळ जाणार होता त्या ठिकाणी आरोपीची बहिण नेपाळला राहते. तिकडे जाणार होता. भारतात इकडे उन्हाळा आहे म्हणून बहिणीला तिकडे येतो म्हटला होता.
पत्रकार परिषदेत माहिती सांगताना अमितेश कुमार म्हणाले, पोलिस तपासाच्या आधारावर आरोपी रेल्वेने नागपूरच्या दिशेने पळालेला आहे असे समोर आले होते. अकोला पोलिसांशी संपर्क करून त्यांना मूर्तिजापूर येथे त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो सापडला नाही, त्यानंतर नागपुरातील रेल्वे स्टेशनवर त्याला एटीएस पथकाने त्याला ताब्यात घेतलेले आहेत, आरोपीला पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे, आज रात्रीपर्यंत पोलिस त्याला घेऊन पुण्यात पोहचतील, यामध्ये कोणताही दहशतवादी अँगल आलेला नाही, ती सर्व घटना त्याने एकट्यानेच केली होती, तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे. तपासातील पुढचे अपडेट आपल्याला वेळोवेळी देण्यात येतील, प्रथमदर्शनी तपासामध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आल्यानंतर सर्व माहिती येईल, या प्रकरणातील जो आरोपी आहे त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्याच्या ठिकाणांवर झडती प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासात आरोपी एकटाच होता अशी माहिती समोर आली आहे, दहा तारखेला तो त्याच्या पर्सनल ट्रीटमेंट साठी तर हॉस्पिटलमध्ये गेला होता, असे प्रथमदर्शनी समोर आले आहे, तपास पूर्ण झाल्यानंतर सर्व माहिती समोर येईल.
मोठी बातमी! पुणे बॉम्ब प्रकरणी आरोपीला नागूपरमध्ये ठोकल्या बेड्या…
पुणे बॉम्ब स्फोटातील जामिनावरील आरोपीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या…
पुणे शहरात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक…
पुणे! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने केला खून; आरोपी जेरबंद…

