Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पुणे: पुणे जिल्ह्यात कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आणि नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, त्याने तब्बल ५० लाख ५५ हजार रुपयांना लुटले आहे.

या प्रकरणी भोंदूला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय ४२) आणि तिचा पती कौटुंबिक वादामुळे वेगळे राहत आहेत. पाच वर्षांपूर्वी या महिलेची भेट औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, पंढरपूर) याच्याशी झाली. आपण ‘देवऋषी’ असल्याचे भासवून गडदे याने महिलेला जाळ्यात ओढले. स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून त्याने पहिल्यांदा महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर लोणेरे, उत्तेखोल आणि माणगाव या ठिकाणी नेऊनही त्याने वेळोवेळी लैंगिक शोषण केले. शारीरिक अत्याचारच नव्हे, तर गडदे याने आर्थिक लूटही केली.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पीडित महिलेला बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. मे २०२१ पासून त्याने रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरूपात महिलेकडून एकूण ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. आपली फसवणूक आणि शोषण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने अखेर ११ एप्रिल रोजी स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी औदुंबर गडदे याच्याविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. स्वारगेट पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka