पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन सख्ख्या अल्पवयीन मावस बहिणींवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, व्हिडिओ बनवला आहे.
आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दुसऱ्याला दिला व त्यांनी तो व्हिडिओ एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणी घरात एकट्या होत्या. अवधूत राजू पंचरस, कुणाल कैलास बोराडे, दोन अल्पवयीन मुले यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावली. दोघी अल्पवयीन बहिणींना मारहाण करत, जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. सदर आरोपींनी मुलींवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो महेश सुभाष तांबे याला दिला होता. त्यानंतर महेश तांबे याने तो व्हिडिओ पीडित अल्पवयीन मुलींपैकी एका मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते.
सदर दोघी बहिणी शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होत्या. काही दिवसापूर्वीच त्या सुट्टीला गावी आल्यानंतर त्यांच्याबरोबर ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी यातील काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे व पारगाव पोलिस स्टेशन चे सपोनि नेताजी गंधारे याबाबतचा पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्हा हादरला! मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन, दारू पाजली अन् लॉजवर अत्याचार…
पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…
पुणे जिल्हा हादरला! पित्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…
The post पुणे जिल्ह्यात दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार अन् बनवला Video… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

