मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव) येथे महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुनम जिग्नेश शिंदे (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना डोबी मळा मंचर येथे घडली आहे. नरेंद्र मारुती निघोट यांनी मंचर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. नरेंद्र निघोट यांची बहीण पुनम जिग्नेश शिंदे अष्टविनायक बिल्डींग मध्येच पती व मुलासह दुसऱ्या माळ्यावर राहात होती. गुरुवारी पहाटे निघोट यांचे मेहुणे जिग्नेश शिंदे हे बहीण व भाचा यांना सोबत घेऊन घरी आले व तुमची बहीण ही दुसऱ्या मुलासोबत रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करत असल्याने सांगितले. त्यानंतर सकाळी नातेवाईकांना मंचर येथे बोलावून घेतले. बहीण ज्याच्याशी चॅटिंग करत होती. त्याच्याशी संपर्क केला. तेव्हा त्याने सायंकाळी तुमच्याकडे येतो असे सांगितले. नंतर त्या मुलाने फोन बंद केला.
सर्वजण घरात असताना पूनम ही इमारतीच्या टेरेसवर गेली व तिने टेरेस वरून खाली उडी मारल्यामुळे गंभीर जखमी झाली. तिला मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारा पूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. नरेंद्र मारुती निघोट यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. सदर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुणे जिल्ह्यात ओढ्याच्या कडेला आढळला बेवारस मृतदेह…
पुणे जिल्ह्यात महिला अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली म्हणून केला खून…
पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…
पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…
पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…
The post पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

