Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरात अनैसर्गिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीला शिरूरमधून अटक.

पुणे शहरात अनैसर्गिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीला शिरूरमधून अटक.

पुणे : पुणे शहरातील मंडई मेट्रो स्टेशनच्या समोरील इमारतीच्या पार्किंगमध्ये अनैसर्गिक संबंधावरून झालेल्या वादातून एका अनोळखी व्यक्तीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने अवघ्या २४ तासांत शिताफीने शिरूर येथून अटक केली आहे.

संबंधित घटना बुधवारी (ता. ४) घडली होती.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

आरोपी रमेश प्रकाश सत्रे (वय २१, रा. कातरड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. मंडई मेट्रो स्टेशनजवळील पार्किंगमध्ये एक व्यक्ती (वय अंदाजे ५०) रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. जखमीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांनी समांतर तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान, पोलिसांना खबऱ्यामार्फत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. आरोपी रमेश सत्रे हा शिरूर तालुक्यातील बोऱ्हाडे मळा येथील भावाच्या घरी लपल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक अभिजित पाटील, कृष्णा बाबर, पोलिस अंमलदार अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, नीलेश जाधव, अभिनव लडकत, अमित जमदाडे, नीलेश साबळे, शुभम देसाई यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. पुढील तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत.

मृत व्यक्ती आणि आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते. दोघांनी दारू पिल्यानंतर त्यांच्यात अनैसर्गिक संबंधावरून वाद झाला. त्यावेळी आरोपीने शेवपुरीच्या दुकानातील कांदा कापण्याच्या चाकूने अनोळखी व्यक्तीच्या गळ्यावर, मानेवर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही चित्रीकरण आणि खबऱ्याच्या मदतीने आरोपीला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले.

पुणे! हिंजवडीत IT इंजिनिअर युवतीने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरुन मारली उडी…

पुणे! निलेश घारेकडून स्वत:च्याच कारवर गोळीबाराचा डाव; कारण…

Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी…

पुणे जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला; मृतांमध्ये दीड वर्षांचे बाळ…

Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…

The post पुणे शहरात अनैसर्गिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीला शिरूरमधून अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka