Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात सत्यसाई कार्तीक यांची गुटखा विक्रेत्यावर कारवाई.

पुणे जिल्ह्यात सत्यसाई कार्तीक यांची गुटखा विक्रेत्यावर कारवाई.

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर कारवाई केली असून, सुमारे दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.

दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, वडगाव मावळ पो.स्टे हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. त्यावरून सहा.पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी 01/05/2024 रोजी रात्री त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पथकाने रात्री 01.10 वाजताच्या सुमारास टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव मधील केशवनगर भागातील एका खोलीमध्ये 1) दिब्यांशू श्रीमुलचंद धारिया (वय 21 वर्ष, राहणार केशवनगर,वडगाव, ता.मावळ, जि पुणे) याचे ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा 1,37,677 रु. (अक्षरी एक लाख सदतीस हजार सहाशे सत्यातर रुपये) किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

आरोपीचा साथीदार नामे तनविर शेख (राहणार केशवनगर, वडगाव मावळ, जिल्हा पुणे) हा पोलिसांची चाहूल लागताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. सदरचा मुद्देमाल जप्त करून वर नमूद दोन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथे पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गु. र. क्र.213/2024 भादवि कलम 328,272,273,34 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा.अंकुश नायकुडे, पो.हवा. नितेश कवडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई…

लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच…

पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची दारु वाहतूकीवर मोठी कारवाई…

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या भावाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post पुणे जिल्ह्यात सत्यसाई कार्तीक यांची गुटखा विक्रेत्यावर कारवाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka