Dailyhunt
पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी.

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी.

पुणे : विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंडमधील इंग्रजी शाळेत उघडकीस आला आहे.

विद्यार्थिनींने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक व शिक्षिका अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

दौड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. वर्गातील एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. ती सही त्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने पाहिली होती. याची माहिती तिने वर्गशिक्षिकेला दिली. याचा राग संबंधित विद्यार्थ्यांने मनात धरला होता. संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्राने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संबंधित विद्यार्थिनीवर अगोदर बलात्कार कर आणि नंतर तिला मारून टाक यासाठी 100 रुपयांची सुपारी दिली. मात्र, ज्या विद्यार्थ्याला याबाबतची सुपारी दिली त्या विद्यार्थ्याने ही सर्व घटना त्या विद्यार्थिनीला येऊन सांगितली. त्यानंतर या विद्यार्थिनीने तिच्या घरी याची माहिती दिली.

अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्गशिक्षक, सुपर वायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाणे गाठले. संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, फिर्यादी स्वत:ही शिक्षक आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! पुणे शहरात शिक्षिकेने शाळेतच ठेवले विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध…

पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन…

पुणे शहरात वर्गातच विद्यार्थ्याने चिरला काचेच्या तुकड्याने गळा…

The post पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka