पुणे: भाजपचे पुण्यातील शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलिस निरीक्षकाने विनयभंग केल्याचा ठपका ठेवला असून, गुन्हा दाखल केला आहे.
'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते सोमवारी (ता. २३) शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यानंतर भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबबस्तासाठी असलेल्या पोलिसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलिस निरिक्षकाला दोन वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला. त्यानंतर त्या महिला पोलिस अधिकार्याने ही गोष्ट वरिष्ठांना सांगितली. त्यानंतर त्या चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आले.
दरम्यान, महिला पोलिस निरीक्षकाने याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्यानंतर प्रमोद कोंढरे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद कोंढरे यांनी एक पत्रक काढून त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून, गैरसमजुतेतून हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. कोंढरे यांच्यावर याआधी देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.
पुणे जिल्हा! तलाठ्याची युवतीसह आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले, पत्नीचे अनैतिक संबंध…
पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…
पुणे शहरात महिलेने चिमुकल्यासह टेरेसवरून मारली उडी; चिठ्ठीत लिहिले…
पुणे! प्रेयसीने घरी एकटी असताना प्रियकराला घरी बोलावले अन्…
पुणे जिल्हा हादरला! पत्नीला तीन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग…
The post पुणे! महिला पोलिस अधिकाऱ्याचा भाजपच्या नेत्याने केला विनयभंग… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

