Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्हा हादरला! पत्नीला तीन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग.

पुणे जिल्हा हादरला! पत्नीला तीन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग.

पुणेः पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना घडली आहे. मित्रांनी देखील आपल्या मित्राच्या पत्नीवर वारंवार अत्याचार केला आहे.

या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील भरतगाव या गावात पीडित महिला आपल्या पतीसोबत राहते. आरोपी पतीने संबंधित महिलेला जीवे मारण्याची धमकी देत, मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले होते. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने हा प्रकार घडत होता. अखेर आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने यवत पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

आरोपी पतीने २०२३ मध्ये पहिल्यांदा पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत तीन मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. त्यानंतर आरोपी पतीने पत्नीला जीवे मारण्याची धमकी देत मित्रांसोबत वारंवार संबंध ठेवण्यास भाग पाडले होते. दोन वर्षांपासून पीडित महिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करीत होती. अखेर पीडित महिलेने पोलिस ठाण्यातच धाव घेतली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी पतीसह तिन्ही मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..

पुणे जिल्ह्यातील युवती अन् नांदेडमधील युवक; शरीरसंबंधानंतर युवतीला सोडून पळाला…

पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka