Dailyhunt
पुणे! पत्नीचा कंपनीत छळ; हतबल नवऱ्याची गळफास घेत आत्महत्या.

पुणे! पत्नीचा कंपनीत छळ; हतबल नवऱ्याची गळफास घेत आत्महत्या.

पुणे : पत्नीचा कंपनीत छळ होत असल्या कारणाने नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुकाराम ज्ञानेश्वर भाले असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ जारी केला होता.

या प्रकरणी भाले यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कंपनीच्या सुपरवायझरसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गारुडीवस्ती परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या तुकाराम भाले यांच्या पत्नी लोणी काळभोर मधील इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीत काम करायच्या. या कंपनीतील व्यक्तीकडून तिचा छळ व्हायचा. या छळाची माहिती तिने आपल्या पतीला दिली होती. आपल्या पत्नीसाठी काहीच करता येत नसल्या कारणाने ते हतबल झाले होते. या हतबलतेतून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

तुकाराम भाले यांनी आत्महत्या करण्यापुर्वी एक व्हिडिओ देखील बनवला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही नाव घेतली होती. करण कसबे, सुनीता कसबे, सारीका कसबे, अजय सिंह अशी नावं घेतली असून, या व्यक्तींमुळे माझा कामधंदा गेला, माझं मोठं नुकसान झाले. माझा अख्खा पैसा देखील गेला. मला यांनी वाटेला लावले, असा आरोप करत तुकाराम भाले यांनी घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

तुकाराम भाले यांनी आत्महत्या केल्यानंतर भाले यांच्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून लोणी काळभोर मधील इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीच्या सुपरवायझरसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

पुणे! प्रांजल खेवलकरांनी अनेकदा मुलींना बोलावले; रोहिणी खडसे म्हणाल्या…

पुणे! Z ब्रीजजवळ भडकलं टोळीयुद्ध, कोयत्याने प्राणघातक हल्ला…

पुणे! लग्नाची बोलणी सुरू असताना फिरायला गेले अन् ठेवले शरीरसंबंध…

पुणे जिल्ह्यात सख्ख्या भावानेच 83 वर्षीय भावाचा केला खून अन्…

The post पुणे! पत्नीचा कंपनीत छळ; हतबल नवऱ्याची गळफास घेत आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka