Dailyhunt
पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिली तंबी.

पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिली तंबी.

पुणे : बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुण्यात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी गुन्हेगारांची झाडाझडती घेत बंदुकधाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे.

पुणे शहरात गोळीबाराच्या घटना घडू नयेत अशी तंबी पोलिस आयुक्तांनी दिली होती. मात्र तरीही गोळीबारची घटना घडली आहे.

पुणे शहरात गोळीबाराचा प्रयत्न झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धीरज अरगडे यांनी तक्रार दाखल केली आहे. दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या धीरज यांचे अरगडे हाइट्स येथे ऑफिस आहे. दुपारी ऑफिसहून परत जात असताना गाडीजवळ आल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळी झाडायचा प्रयत्न केला. सुदैवाने गोळी सुटली नाही, पुन्हा हल्लेखोराने पिस्तूल कॉक करून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला तेव्हाही हल्लेखोराचा प्रयत्न फसला. त्यावेळी अरगडे यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर तिथून पसार झाले.

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पुणे शहरात मंगळवारी दुपारी घडलेल्या घटनेनंतर बुधवारी सकाळी आणखी एका ठिकाणी गोळीबाराची घटना घडली. हडपसरमधील शेवाळवाडीत व्यावसायिक वादातून गोळीबार झाला. यात जयवंत बापूराव खलाटे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गोळी लागली. या प्रकरणी सुधीर रामचंद्र शेडगे याला अटक करण्यात आली आहे. दोघेही माजी सैनिक असून सिक्युरीटी ठेकेदार आहेत. नंदीनी ड्री सोसायटीत सिक्युरीटी गार्डच्या मुलांवरून दोघांमध्ये वाद झाला होता. यातून सुधीर यांनी जयवंत यांच्या पायावर गोळी झाडली. दुसरी गोळीही झाडली पण नेम चुकल्याने जयवंत बचावले.

दरम्यान, पुणे पोलिस आयुक्तांकडून गुन्हेगारांची परेड घेत असतानाच जंगली महाराज रोडवर गोळीबाराचा झालेला प्रयत्न आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गोळीबाराची घटना घडल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोयता गँग, ड्रग्ज प्रकरण यानंतर गोळीबाराच्या घटनांमुळे पुणे सातत्याने चर्चेत येत आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय…

पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे…

पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…

पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…

पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिली तंबी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka