Dailyhunt
पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल.

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल.

पुणे: पुणे शहरात बंडू आंदेकर आणि निलेश घायवळ टोळीने दहशत माजवली असताना आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील वाहनांची तोडफोड, कोयत्याचा वापर करून होणारे हल्ले आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते 'पुणे गणपती' पुस्तकाचे प्रकाशन!

आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरभर नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या विशेष मोहिमेत गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, राज्य राखीव पोलिस बल आणि पोलिस मुख्यालयातील विशेष पथके सहभागी होणार आहेत. शहरातील गुंड टोळ्यांकडून चोरीच्या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने, अशा संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विशेषतः, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीदरम्यान पोलिस अधिकारी आणि अंमलदार 9-एमएम कार्बाईन आणि पिस्तूलसारखी शस्त्रे सोबत बाळगतील. शहराच्या प्रत्येक भागात शस्त्रसज्ज पोलिस तैनात असतील, जेणेकरून गुन्हेगारांवर वचक बसेल. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब आणि बारवरही आता पोलिसांची नजर असणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू असणाऱ्या अशा ठिकाणांच्या चालक आणि मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभावी गस्त वाढवण्याचे आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सक्रिय राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांनी 112 या पोलिस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर तक्रारी नोंदवण्यास सांगितले आहे. पोलिसांची ही नवी मोहीम शहरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…

आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी ताब्यात…

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण! रोहिणी खडसे यांच्या पतीच्या अडचणीत वाढ…

निलंबित IAS पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल…

The post पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka