पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन बेकायदेशीरपणे सुरू असलेला बंदूक बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. मध्य प्रदेशातील एका दुर्गम गावात शिरून पुणे पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
पिस्तूलांसह इतर शस्त्रे बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करत, तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पिस्तूलांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळाही जप्त केला आहे. शिवाय, आंतरराज्यीय कारवाईत ३६ संशयित ताब्यात घेतले आहे.
संघटित गुन्हेगारीविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेमध्ये पुणे शहर पोलिसांनी आणखी एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-४ यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-४ व गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय अवैध शस्त्रास्त्र पुरवठा व तस्करी करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले. विमानतळ पोलिस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. ५५८/२०२५ च्या तपासातून उमरटी (ता. लेघवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) येथे बेकायदेशीर शस्त्रनिर्मितीचे जाळे कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. पुणे पोलिसांनी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने उमरटी येथे धडक छापा टाकला.
कारवाईत पोलिसांनी 100 पेक्षा अधिक गन बॅरलसह ५ मॅगझिन १४ ग्रेंडिंग मशीन २ पिस्तूल ४ काडतुसे जप्त केले आहेत. तसेच यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या ४७ जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्वजण संबंधित कारखान्यात बेकायदेशीरपणे हत्यारं बनवत होते. अशाप्रकारे वेगळ्या राज्यात जाऊन पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानं सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
उमरती गावात टाकलेल्या या धाडीत काही लोक बेकायदेशीरपणे हत्यारं बनवताना आढळले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ४७ जणांना ताब्यात घेतले आणि त्यांना अटक केली आहे. अद्यापही संबंधित कारखान्याची आणि परिसराची पुणे पोलिसांकडून कसून झडती घेतली जात आहे. पुणे शहरात होणारा अवैध शस्त्रपुरवठा पूर्णपणे थांबवण्यासाठी पुणे पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
कारवाईतील महत्त्वाचे मुद्दे…
– बेकायदेशीर शस्त्रनिर्मितीत सहभागी ३६ संशयितांना ताब्यात
– शस्त्रास्त्रे, कच्चामाल व अत्याधुनिक साहित्य जप्त
– शस्त्रनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ५० भट्ट्या नष्ट
– मोठ्या प्रमाणात तयार शस्त्रे व मोल्डिंग साहित्य जप्त
तपासातून उघड झाले की या ठिकाणी “उमरटी शिकलगार आर्म्स (USA)” या ब्रँड नावाखाली विविध प्रकारची बेकायदेशीर अग्निशस्त्रे तयार केली जात होती आणि त्यांची आंतरराज्यीय पातळीवर तस्करी केली जात होती. याआधी पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधील २१ बेकायदेशीर अग्निशस्त्रांशी संबंधित गुन्ह्यांच्या तपासातूनही या रॅकेटचा उलगडा झाला होता. कारवाईदरम्यान पोलिसांच्या सुरक्षिततेकरिता क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), आर्म व अॅम्युनिशन, मोबाईल सर्व्हेलन्स व्हेईकल्स, तात्पुरते वायरलेस नेटवर्क, बुलेटप्रूफ जॅकेट, बॉडी वॉर्न कॅमेरे यांचा वापर केला. संबंधित कारवाई सुमारे ५०० किमी अंतरावरील कठीण भौगोलिक परिस्थितीत यशस्वीपणे पार पडली. बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा साखळी उलगडण्यासाठी व अंतिम प्राप्तधारकांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून लवकरच आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
संबंधित कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर पंकज देशमुख, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ४, पुणे शहर सोमय मुंडे यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलिस निरीक्षक नितीन नाईक, सहा. पोलिस निरीक्षक मदन कांबळे, सहा. पोलिस निरीक्षक कल्याणी कासोदे, पोलिस अंमलदार पठाण, देशमुख, कारखेले, मुंढे, पवार, तांबेकर, रोकडे, रणपिसे, माने, खरात, पानसरे यांनी पुण्यापासुन ५०० किलोमीटर लांब जाऊन यशस्वीरित्या पार पाडली आहे.
पुणे! टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर लावला मोक्का; दणाणले धाबे…
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…
पुणे! नवीन थारने कोकणात जाताना अपघातात सहा मित्रांचा मृत्यू; पाहा नावे…
पुणे स्टेशनवर महिलेसोबत ओळख अन् घरी आणल्यावर बाप-लेकाचं कांड…

