Dailyhunt
पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको.

पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको.

पुणे : पत्नी आणि मुलींच्या त्रासाला कंटाळून पर्वती येथील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या म्हाडाच्या एका वरिष्ठ लिपिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी बहिणीला व्हिडीओ कॉल करत आता मी जातो आहे, पण ताई त्यांना सोडू नको, असे म्हणत जीवन संपवले.

भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यामुळे पर्वती परिसरात खळबळ उडाली आहे.

नितिन साळवे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. यानंतर साळवे घराबाहेर पडले आणि टोकाटे पाऊल उचलले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला. नितीन साळवे हे मुंबई येथील म्हाडा कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. पुण्याला त्यांचे कुटुंब राहत होते, ते फक्त शनिवार आणि रविवारी पुण्यात राहत असत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

नितीन साळवे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या बहीण पूनम उमेश कांबळे यांना त्रास असह्य होतोय असे म्हटले होते. बहिणीला व्हिडीओ कॉल करत आता मी जातो आहे, पण यांना सोडू नको ताई असे म्हटले होते. त्यानंतर बहिणीने पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणताही प्रतिसाद दिला नाही. बहिणीने नितीनच्या पत्नी आणि मुलींवर गंभीर आरोप केले आहेत. पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे! नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा केला खून; चारित्र्यावरून संशय…

पुणे! तुझ्यामुळे आम्हाला तुरुंगात जावं लागलं, थेट कोयत्याने वार…

पुणे जिल्ह्यात गरोदर महिलाचा आढळला मृतदेह; हातावर रविराज नावाचा टॅटू…

पुणे पोलिसांची निलेश घायवळच्या गँगवर आणखी मोठी कारवाई…

पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं आयुष्य…

Loading…

The post पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka