पुणे: पुणे शहरातील दत्तवाडी, लक्ष्मी नगर, पर्वती परिसरात तब्बल 40 गाड्यांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार चाकी आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. दत्तवाडी, लक्ष्मीनगर, पर्वती परिसरात मंगळवारी (ता. २८) रात्री 40 गाड्या फोडल्याची घटना घडली आहे. पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात बी. टी. कवडे रोड येथे कोयता गँगची दहशत निर्माण करण्यासाठी 50 वाहनांची तोडफोड केली गेली होती. येरवड्यात देखील गाड्याची तोडफोड केल्याचे समोर आले होते.
दरम्यान, पुणे शहरातील काही भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे पाहून, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'कॉप 24' उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, 726 पोलिस कर्मचारी केवळ गस्त घालण्याचे काम करतील, आणि ते गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली कार्य करतील. या उपक्रमाचे नंतर दैनंदिन कामकाजात रूपांतर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन विद्यार्थ्याने विद्यार्थिनीला मारण्यासा दिली १०० रुपयांची सुपारी…
पुणे शहरात पोलिसांची मोठी कारवाई; लाखो रुपयांचे अंमली पदार्थ, गांजा जप्त…
धक्कादायक! पुणे शहरात चिमुकल्यासमोरच कात्रीने कापला पत्नीचा गळा; सांगितलं कारण…
पुणे! विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी…
पुणे शहरातील बोपदेव घाटात दहशत माजविणाऱ्यांना सात जणांना केली अटक; पाहा नावे…
The post पुणे शहरात गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच; रात्रीत 40 गाड्यांची तोडफोड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

