पुणे: पुणे शहरात असलेल्या रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्य रात्रीच्या सुमारास एका टोळक्याने पाठलाग करून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजू शिवशरण असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री टोळक्यांकडून राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याने पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजू शिवशरण हा रामटेकडी परिसरातील कुख्यात गुंड होता. राजू शिवशरण खून प्रकरणात वानवडी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
राजू शिवशरणचा भाचा निखिल कैलास चव्हाण, (रा. वंदे मातरम चौक गणपती मंदिर मागे, रामटेकडी, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर महेश शिंदे ,नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी ,दुर्गेश उर्फ बल्ल्या गायकवाड (रा. सर्व रामटेकडी व इतर दोघेजण अनोळखी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील रामटेकडी येथे वंदे मातरम चौकात शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हि घटना घडली. महेश शिंदे ,नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी ,दुर्गेश उर्फ बल्ल्या गायकवाड आणि दोन जणांनी पैसे न दिल्याच्या कारणावरून राजू शिवचरणला वीट, दगड , सिमेंटचे तुकडे, तसेच लाथा बुक्क्याने मारून गंभीर जखमी केले. त्यावेळी राजू शिवशरणचा भाचा निखिल चव्हाण याने वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महेश शिंदेने त्याच्याही डोक्यात बाटली मारून त्याला जखमी केले आणि तो पळून गेला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…
पुणे शहरात व्यावसायिकाची गोळ्या झाडून आत्महत्या…
पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना; भरदिवसा महिलेची हत्या…
पुणे हादरलं! क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने केली युवकाची हत्या…
The post पुणे शहरात गुंडाची हत्या; टोळक्याने पाठलाग करून ठेचलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

