Dailyhunt
पुणे शहरात पोलिसकाकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या.

पुणे शहरात पोलिसकाकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या.

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट पोलिस वसाहतीत वास्तव्यास असलेल्या पोलिसाच्या पत्नीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्योती कैलास बर्डे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या पोलिस पत्नीचे नाव आहे.

ज्योती बर्डे यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे समजू शकलेले नाही. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती बर्डे यांचे पती कैलास हे पुणे शहर पोलिस दलात नियुक्तीस आहेत. ज्योती या पतीसोबत स्वारगेट येथील कर्मचार्‍यासाठी असलेल्या शासकीय निवास्थानात राहत होत्या. शुक्रवारी (ता. 6) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. ज्योती यांनी गळफास घेतला तेव्हा त्यांचा भाऊ घरी होता. त्याने ज्योती यांना खाली उतरवले. याबाबत खडक पोलिसांना माहिती देण्यात आली होती. उपचारासाठी ज्योती यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. घटनास्थळी खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी भेट दिली. पोलिसांना ज्योती यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहलेली कोणतीही चिठ्ठी मिळून आलेली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील पोलिसकाकाची गोळी झाडून आत्महत्या…

पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….

पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

The post पुणे शहरात पोलिसकाकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka