पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा पोलिस ठाणे हद्दीत पार्किंग करुन ठेवलेल्या रिक्षांची डिस्कटायर चोरांना पोलिसांनी २४ तासाच्य आत गजाआड केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुंढवा पोलिस ठाणे हद्दीतील स.नं.
मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दाखल गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून पाहणी व पडताळणी करुन दाखल गुन्हयाची मोडस, संशयीतांची माहिती काढून तपास पथक अधिकारी व अंमलदार यांना आरोपींचा शोध घेणे बाबत सक्त सुचना देवून हद्दीत परहद्दीत शोध घेणेकामी रवाना केले. आरोपींचा शोध घेत असतांना तपास पथकातील पोलिस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना गुप्त बातमीदारांमार्फत सदरचा गुन्हा करणारे आरोपी हे हडपसर-मुंढवा रोड वरील ब्रिजखाली येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सहा. पोलिस निरीक्षक राजू महानोर व स्टाफ यांनी सापळा लावला. सदर आरोपी
१) वाजिद युनूस अन्सारी, वय २२ वर्षे, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे
२) झैद जविद शेख, वय २२ वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे यांना ताब्यात घेतले. सदर ठिकाणी दाखल गुन्हयातील चोरीस गेले मालाचे वर्णनाप्रमाणे डिस्कटायर असलेली रिक्षा मिळून आल्याने दाखल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आली आहे. नमुद आरोपीतांनी चोरी करण्यासाठी वापरलेली ०१ तीन चाकी रिक्षा, १० डिस्कटायर, ०१ स्टील टायर खोलण्याचा पाना असा एकुण ६०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा तपास पोलिस अंमलदार राकेश बोबडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलिस आयुक्त, मनोज पाटील, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप-आयुक्त, आर. राजा, परिमंडळ – ५, पुणे शहर, सहा. पोलिस आयुक्त, अश्विनी राख, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, पोलिस सहा. पोलिस निरीक्षक, राजू महानोर, सहा. पोलिस फौजदार, संतोष जगताप, पोलिस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, राहुल मोरे, राकेश बोबडे व इतर स्टाफ यांनी केली आहे.
जेनिफर अँड द बीस्ट पुस्तकाचे प्रकाशन! पोलिसांनी लेखनातून व्यक्त व्हावे: अशोक धिवरे
पुणे शहरातील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; मुंढवा पोलिसांकडून सत्कार…
मुंढवा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला केले गजाआड…
मुंढवा पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्यास २४ तासात केली अटक…
मुंढवा पोलिस स्टेशनच्या पोलिसकाकांमुळे युवकाचे वाचले प्राण…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post पुणे शहरात रिक्षांचे टायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांनी केले गजाआड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

