Dailyhunt
पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली.

पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली.

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

पुणे शहरातील रात्रीच्या वेळी पबमध्ये चालणारा धांगडधिंगाबाबत पोलिसकाका टीमने ‘रात्रीस खेळ चाले, पुणे तेथे काय उणे’ या सदराखाली मालिका सुरू केली होती. शिवाय, तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत असल्याचे धडाकेबाज वार्तांकन केले होते. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपक्रम शहरात राबवले जात आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्त पदाचा भार अमितेश कुमार यांनी स्विकारल्यापासून पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सोमवारी (ता. १९) झालेल्या पत्रकार परिषदेनंतर पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिसांनी केलेल्या सूचना पुढीलप्रमाणेः
– हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती देणे गरजेचे
– स्वच्छतागृह वगळता हॉटेलमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणं बंधनकारक
– हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या तसंच बाहेर पडण्यासाठीच्या मार्गावरही सीसीटीव्ही कॅमेरे असणं आवश्यक
– सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे असावेत
– हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चारित्र्यपडताळणी करणे आवश्यक
– कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक असेल
– हॉटेलमध्ये धुम्रपानासाठी (स्मोकिंग झोन) स्वतंत्र जागा असावी.

Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…

पुणे शहरात परदेशी व्यक्तीकडून ३० लाखांचे कोकेन जप्त: अनिता हिवरकर

पुणे शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार…

पुणे शहरात 'रात्रीस खेळ चाले'; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka