Dailyhunt
पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं आयुष्य.

पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं आयुष्य.

पुणे : पुणे शहरातील जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीवरून उडी मारत एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) घडली आहे. या घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

नामदेव जाधव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते वडकी भागात राहत होते. जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादासंदर्भात त्यांची केस पुणे जिल्हा न्यायालयात गेल्या २७ वर्षांपासून प्रलंबित होती. मात्र, इतक्या वर्षांच्या सुनावणीनंतरही न्याय मिळत नसल्याने आणि प्रकरणात काहीही निकाल लागत नसल्याने ते अत्यंत नैराश्यात होते. आज सकाळी नामदेव जाधव न्यायालयात हजर झाले होते. मात्र, काही वेळानंतर त्यांनी अचानक कोर्टाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

दरम्यान ,प्राथमिक चौकशीतून हे स्पष्ट झाले आहे की, न्याय मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे आणि खटला दीर्घकाळ चालत राहिल्याने जाधव मानसिक तणावाखाली होते. गेल्या २७ वर्षांपासून न्यायालयाचे चक्कर मारूनही काही निर्णय मिळत नाही, त्यामुळे त्यांनी नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

पुणे! स्वारगेट पोलिसांनी सोन्याची बांगडी चोरणाऱ्यास केले जेरबंद…

पुणे! प्रेयसीचा वाढदिवस लॉजवर साजरा केला अन् केली निर्घृण हत्या…

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी बेकायदेशीर देशी कट्टा बाळगणाऱ्यास केले जेरबंद…

पुणे! NDA मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

पुणे ! ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार…

Loading…

The post पुणे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं आयुष्य… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka