Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
न्यायालयाने सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्याला ठोठावला दंड.

न्यायालयाने सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्याला ठोठावला दंड.

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुहास गोडे व घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी आपल्या वेतनातून पिडीत याचिका कर्त्याला २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे यांनी सोमवारी दिले.

याचिका कर्ता सागर भोयर यांचे तर्फे ॲड. महेश धात्रक यांनी उच्च न्यायालयात युक्तीवाद केला.

जेसीबी जप्त प्रकरणात घाटंजी येथील याचिका कर्ता सागर भोयर यांनी ॲड. महेश धात्रक यांचे मार्फत उच्च न्यायालयात सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुहास गाडे व इतरांविरुद्ध याचिका दाखल केली होती. सदर प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. दाखल याचिकेनुसार, सदरची घटना ३० नोव्हेंबर २०२४ रोजीची होती. घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे माहितीच्या आधारे एका शेतात छापा टाकून एक जेसीबी जप्त केला होता. माहिती नुसार घटनास्थळी ट्रॅक्टर सापडले नाही. त्यामुळे जेसीबी जप्त करण्यात आला. परंतु, येथे मुरुम व दगडाचे कोणतेही पुरावे आढळले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने जेसीबी जप्तीचा कारवाई बेकायदेशीर ठरवली. दरम्यान, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुहास गाडे यांनी जेसीबी मालकाला ७ लाख ५० हजार रुपये दंड ठोठावला होता.

या बाबत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुहास गाडे (केळापूर) व घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी उच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली होती. केळापूर चे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुहास गाडे यांनी १ लाख ५० हजार रुपये व पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी ५० हजार रुपये असे एकूण २ लाख रुपये १५ कामकाजाच्या दिवसांत याचिका कर्ता यांना वेतनातून किंवा धनादेश द्वारे देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी दिले. दरम्यान, याचिका कर्ता सागर भोयर यांची बाजू ॲड. महेश धात्रक यांनी उच्च न्यायालयात मांडली.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

29)पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

30)पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

52) IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

The post न्यायालयाने सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्याला ठोठावला दंड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka