Dailyhunt
पुणे! स्वारगेट पोलिसांनी सोन्याची बांगडी चोरणाऱ्यास केले जेरबंद.

पुणे! स्वारगेट पोलिसांनी सोन्याची बांगडी चोरणाऱ्यास केले जेरबंद.

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील स्वारगेट येथील धायरी पी.एम.टी. स्टॉप येथे महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरी करणाऱ्या चोरटयास
स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे.

स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं २५८ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) मधील फिर्यादी या २९/०९/२०२५ रोजी सायंकाळी ०५/०७ ते ०५/३० वाजताचे सुमारास स्वारगेट येथील धायरी फाटा बस स्टॅण्ड येथे स्वारगेट ते नऱ्हेगांव बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून फिर्यादीच्या हातातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी कट करुन चोरी केली होती म्हणून फिर्यादी यांनी अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दिल्याने वर नमुद गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेकामी यशवंत निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर यांनी स्वारगेट पोलिस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना देवुन गुन्हा उघडकीस आणणेकामी आदेशित केले होते. त्यावरुन तपास पथकातील अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील व पोउपनिरी रविंद्र कस्पटे यांनी तपास पथकातील सुजय पवार व हर्षल शिंदे यांना धायरी पीएमटी स्टॉप जवळील सीसीटिव्ही फुटेज पाहणेबाबत आदेश दिले. त्यावरुन सुजय पवार व हर्षल शिंदे यांनी सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली त्यावरुन एक व्यक्ती संशयास्पद दिसून आला. सदर संशयित इसमाचे व्यवस्थित फुटेज मिळणेकामी हर्षल शिंदे व सुजय पवार यांनी स्वारगेट, हडपसर, मांजरी, येरवडा, केशवनगर, मुंढवा याठिकाणांवरील जवळ-जवळ १०० ते १५० सीसीटिव्ही फुटेज पाहुन सदर आरोपीचा व्यवस्थितीत वर्णनाचा फोटो प्राप्त केला.

बातमीदारांना सदर फोटो मधील व्यक्तीचा शोध घेणेकामी सांगितले असता दि. ०७/१०/२०२५ रोजी सुजय पवार व हर्षल शिंदे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील संशयित व्यक्ती हा मुंढवा परिसरामध्ये राहण्यास आहे. अशी बातमी मिळाल्याने लागलीच वरिष्ठांचे परवानगीने स्टाफसह जावुन
सर्वोदय कॉलनी मुंढवा येथे जावुन बातमीप्रमाणे व्यक्तीचा शोध घेतला असता राज कृष्णा माने (वय २३ वर्षे रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा पुणे) हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीकडुन तपासा दरम्यान दाखल गुन्ह्यातील एकुण २,५०,०००/- रुपये किंमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याचे बांगडी जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी ही राजेश बनसोडे, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मिलींद मोहिते, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ- २, पुणे शहर, राहुल आवारे, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर, विकास भारमळ, पोलिस निरीक्षक (गुन्हे), स्वारंगेट पोलिस स्टेशन पुणे शहर यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलिस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पो.हवा. अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, पोलिस अंमलदार सुजय पवार, दिपक खेंदाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, संग्राम केंद्रे, प्रशांत टोणपे, हनुमंत दुधे, सागर काळे यांनी एकत्र मिळुन केली आहे.

पुणे! स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस…

पुणे ! स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरातील प्रवाशांचे दागीने चोरणारी महिला जेरबंद…

स्वारगेट एस.टी. स्टँन्ड परिसरात प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणारी महिला जेरबंद…

पुणे! स्वारगेट पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…

स्वारगेट बस स्टॅण्ड येथे लॅपटॉप चोरी करणारा स्वारगेट पोलिसांकडून जेरबंद…

The post पुणे! स्वारगेट पोलिसांनी सोन्याची बांगडी चोरणाऱ्यास केले जेरबंद… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka