Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार.

पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार.

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये युवतीवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी विद्येच्या माहेरघरात आणखी एक बलात्काराची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत ओळखीचा गैरफायदा घेत युवतीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये आरोपी सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित युवतीला आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार धमकी देत आहे. तसेच तिच्या मोबाईल क्रमांकावर अश्लील फोटो सुद्धा आरोपीकडून पाठवण्यात आले आहेत. याबाबत पीडित युवतीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करून तो आमच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. 26 फेब्रुवारीला भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला तो गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. पीडित युवतीने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यावर त्याचा पुढील तपास सुरू केलेला आहे. आरोपीचा फोन बंद असल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा तांत्रिक तपास करून आम्ही आरोपी पर्यंत पोहोचू आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करू असे भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सांगितले आहे.

सहा विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; व्हिडिओ बनवला अन्…

माजी मंत्र्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल; बलात्कार अन् गर्भपात…

मुंबई हादरली! जोगेश्वरीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; बसला मानसिक धक्का…

विवाहित महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न; चेहऱ्यासह शरिरावर केले 15 पेक्षा जास्त वार…

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड; तहान लागली अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka