Dailyhunt
पुणे विमानतळावरून भाजपचा पदाधिकारी अटकेत; कारण बॅगेत.

पुणे विमानतळावरून भाजपचा पदाधिकारी अटकेत; कारण बॅगेत.

पुणे: भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडे पिस्तूल आणि जिवंत काडतूसे आढळल्याने विमानतळ अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दीपक काटे (रा. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक काटे हे पुण्याहून हैदराबादला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणार होते. विमानतळ सुरक्षा तपासणी अधिकाऱ्यांना रात्री 10.53 वाजण्याच्या सुमारास बॅग तपासणी दरम्यान दीपक काटेकडून 28 जिवंत काडतूसे आणि 7.65 एमएम कॅलिबर आणि दोन मॅग्झीन आढळून आले. त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांनी सीआयएसएफ आणि पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान पुणे विमानतळावर त्यांना अटक करण्यात आली.

विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप कापरे यांनी सांगितले की, ‘वैद्यकीय तपासणी करून आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला न्यायलयीन कोठडी सुनावली. दीपक काटे याने आरोप फेटाळून लावले आहेत. आपण सातत्याने विमान प्रवास करतो. त्यामुळे नियमांबाबत कल्पना आहे. आपल्याला फसवण्यासाठी कोणीतरी हा कट आखला आहे.’

दीपक काटे हा शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेचा संस्थापकही आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील, राम सातपुते, मुरलीधर मोहोळ या नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत.

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

धक्कादायक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांची आत्महत्या…

हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…

शरद मोहोळ याच्या हत्येचा घेणार होते बदला; पुणे पोलिसांनी मोठा कट उधळला…

पुणे शहरात पिस्टल जवळ बाळगणाऱ्यास सहकारनगर पोलिसांनी घेतले ताब्यात…

The post पुणे विमानतळावरून भाजपचा पदाधिकारी अटकेत; कारण बॅगेत… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka