Dailyhunt
हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट.

हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट.

पुणेः पिंपरी-चिंचवडमधील राजू राजभर या रिक्षा चालकाने सावकाराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सावकारांनी केलेला जाच व्हिडीओद्वारे मांडला आहे. शिवाय, सुसाईड नोट देखील लिहिली आहे.

निगडी पोलिसांनी या प्रकरणी चार ही सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राजू यांनी हनुमंता गुंडे, महादेव फुले, राजीव कुमार आणि रजनी सिंह या चौघांकडून कर्ज घेतले होते. दहा टक्क्यांनी ते फेडायचे ठरले. अडीच वर्षांपूर्वी घेतलेले हे कर्ज फेडण्यासाठी राजू रिक्षावर रात्रं-दिवस काम करत होते. चार ही सावकारांनी हिशोबात मोठा घोळ घातला अन पैसे रोख घेत, त्याच्या नोंदी ही टाळल्या. पैश्यांसाठी ससेमिरा सुरुचं राहिला, परिणामी इतर फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेण्याची वेळ आली. या कर्जातून ते कर्ज फेडण्याचं त्यानी ठरवले.

कर्जाचा फास आळवत गेला पण या सावकारांचे कर्ज काही फिटलं नाही. शेवटी राजू यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पण तत्पूर्वी रिक्षात बसूनचं झालेला जाच व्हिडीओद्वारे समाजासमोर मांडायचा निर्णय घेतला अन् कर्जाचा फास त्यांच्या गळ्याभोवती कसा आळवला गेला हे त्यांनी सांगितले. पत्नी, मुलगा, मुलगी यांची माफी मागितली. मंजू मला माफ कर, मुलांनो घरात बनेल ते खा, आईला त्रास देऊ नका, असे हृदयद्रावक आवाहनही त्यांनी केले.

राजू राजभर म्हणाले, ‘कर्जाच्या दलदलीतून बाहेर येण्यासाठी बरेच प्रयत्न केले, अनेकांनी मला साथ ही दिली, बरंच संजवलं ही पण आता मी हरलोय, हे सांगताना राजूंनी अश्रू ढाळत व्हिडीओ थांबवला. हे सगळं सुसाईड नोटमध्ये ही नमूद केलं अन् घरातल्या खोलीत जाऊन भर दिवसा गळफास घेतला.’ पत्नी, मुलगा आणि मुलगी यावेळी घरातच होते. दुपारी खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न झाला अन् ही धक्कादायक बाब समोर आली. निगडी पोलिसांनी या प्रकरणी चार ही सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच राजीव कुमार आणि रजनी सिंह यांना बेड्या ही ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यातील शिक्षक दाम्पत्यानं संपवलं जीवन…

हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…

हृदयद्रावक! प्रियकरासाठी व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! बंगळुरुच्या इंजिनिअरनं मृत्यूपूर्वी दिलं बाळाला गिफ्ट; सांगितलं 2038 मध्ये उघड…

हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…

The post हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka