Dailyhunt
पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्.

पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्.

पुणे: धाराशिव येथे एका विवाहित प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिकेत महादेव कांबळे (वय 33) याने राणी गायकवाड (वय 26) हिचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

राणी सतत अनिकेतसोबत राहण्याचा आणि लग्न करण्याचा आग्रह धरत असल्याने कंटाळून त्याने हा कट आखला होता. वाकड पोलिसांनी अनिकेतला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

राणी 26 नोव्हेंबर रोजी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी वाकड पोलिसांत दिली होती. पोलिसांना तपासादरम्यान राणी सतत अनिकेतच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अनिकेत याला चौकशीसाठी बोलावले. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक पुरावे समोर येताच त्याने खुनाची कबुली दिली.

राणी आणि अनिकेत दोघेही विवाहित होते आणि त्यांना मुलेही आहेत. राणीच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यानंतर ती नवऱ्यापासून दूर जाऊन अनिकेतसोबत राहण्याचा आणि लग्न करण्याचा हट्ट धरत होती. परंतु अनिकेत स्वतः विवाहित असल्याने तो यासाठी तयार नव्हता. तिच्या सततच्या तगाद्यामुळे अनिकेत त्रस्त झाला होता.

निकेतने 26 नोव्हेंबर रोजी राणीला फिरण्यासाठी बोलावले. दोघेही कारमधून फिरत असताना त्यांच्यात सोबत राहण्यावरून व लग्नावरून पुन्हा वाद झाला. आधीच खुनाचा निर्णय घेतलेल्या अनिकेतने राणीला ‘गावी घेऊन जातो’ असे सांगून कार धाराशीव जिल्ह्याच्या दिशेने वळवली. ढोकी गावाजवळ 27 नोव्हेंबर रोजी पहाटे कार थांबवून, झोपेत असलेल्या राणीचा गळा दाबून त्याने तिचा खून केला. त्यानंतर लोखंडी रॉडनेही तिच्यावर वार केले. घाबरलेल्या अवस्थेत त्याने मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, अनिकेतविरुद्ध मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राणीच्या हत्येप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेम! प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न; आयुष्यभर तुझीच राहिल…

पुणे शहरात MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला जगाचा निरोप…

पुणे हादरलं! महिलेने गुंगीचं औषध देऊन युवकावर केला बलात्कार…

पुणे! चुलत भावाची हत्या करून मृतदेह भरला पोत्यात अन् फेकला…

पुणे स्टेशनवर महिलेसोबत ओळख अन् घरी आणल्यावर बाप-लेकाचं कांड…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka