Dailyhunt
पुणे शहरात MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला जगाचा निरोप.

पुणे शहरात MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला जगाचा निरोप.

पुणे : पुणे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाचा मृतदेह शुक्रवारी (ता. २८) सकाळी आढळून आला आहे. सागर पवार (वय 26) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सागर पवार हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून तो पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेईंग गेस्ट पद्धतीने राहत होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तो त्याच्या राहत्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी घाव घेतली आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला.

प्राथमिक तपासात सागरने MPSC चा अभ्यास करत असताना वाढलेल्या दडपणामुळे आणि नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही, त्यामुळे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर कारण समजू शकेल. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! युवतीने 9व्या मजल्यावरून घेतली उडी; हृदयद्रावक चिठ्ठी…

पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको…

पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…

पुणे! पत्नीचा कंपनीत छळ; हतबल नवऱ्याची गळफास घेत आत्महत्या…

पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…

Loading…

The post पुणे शहरात MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka