Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा.

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा.

नाशिक: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 30 वर्ष जुन्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात आली आहे.

1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 1995 ते 1997 च्या दरम्यानचे हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाही, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती.

1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होते आणि आज या प्रकरणाचा निकाल लागला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र, इतर दोन जणांबाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र, माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दरम्यान, न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते आणि तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागू शकतो. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…

प्रियकराला विष घालून ठार मारणाऱ्या प्रेयसीला फाशीची शिक्षा…

बापरे! सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला साताजन्माची शिक्षा…

लाच घेतल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा व 12 हजार द्रव दंड…

पुणे अपघात! निबंध लिहण्याची 'कठोर' शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

The post राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka