Dailyhunt
राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय.

राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सरताच आणि निवडणूक निकाल लागताच गृह विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांच्या सुरक्षतेत कपात करण्याचे गृह विभागाने ठरवले आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतलेला आहे. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यावर गृह विभागाने निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांच्या सुरक्षतेत कपात केली जाणार आहे. त्यानुसार भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रतापराव चिखलीकरांसह विविध नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे मंत्री वगळता आमदारांना दिलेली सुरक्षाही कमी केली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याक आलेली होती. तत्कालिन परिस्थिती लक्षात घेऊन आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आलेली होती. मात्र आता गरज नसताना सुरक्षेचा लवाजमा घेऊन मिरवणाऱ्यांची सुरक्षा काढून घेतली जाणार आहे.

महायुती सरकारला तीन महिने पूर्ण होत आली आहेत, पण सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांची अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणावर आहे. पालकमंत्रिपदाचा विषय मार्गी लागलेला नसताना आता शिवसेना आमदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये संतापाचे वातावरण असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, तानाजी सावंत यांनी आधीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असताना त्यांनी हट्टाने त्यांच्या सुरक्षेसाठी 48 पोलिस कर्मचारी नियुक्त करुन घेतले होते. मात्र, ते आता मंत्री नसल्याने त्यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता केवळ एक पोलिस सुरक्षारक्षक उरला आहे.

तानाजी सावंत यांच्या मुलाचे चार्टर्ड फ्लाईट विमान हवेतूनच माघारी; 68 लाख रुपये खर्च…

पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…

अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…

महाराष्ट्रात वाहनांशी संबंधित नियम बदलणार; अन्यथा 10 हजार रुपयांचा दंड…

पुणे पोलिसांच्या 'तरंग' कार्यक्रमाला लागली नाराजीची किनार…

The post राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka