पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदार हे सतत विविध बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे, अधिवेशन, इ. कर्तव्यावर तैनात असल्याने पोलिस अधिकारी/अंमलदार समवेत त्यांचे कुटुंबीय देखील ताणतणावामध्ये असतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरिक हवाई वाहतूक व सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास मंत्री माधुरी मिसाळ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते. तरंगमध्ये गायक व संगीतकार अजय-अतुल यांच्या संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांनी आनंद घेतला.
सदर कार्यक्रमांतर्गत अजय अतुल लाईव्ह संगीत रजनी हा मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमास पुणे शहरातील सर्व शांतता कमिटी/मोहल्ला कमिटीचे सदस्य व इतर महत्वाचे व्यक्ती तसेच सर्व प्रिंट व इलेक्ट्रानिक मिडीयाचे संपादक व प्रतिनिधी यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.
पोलिस दलातच प्रचंड नाराजी…
उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. परंतु, काही अधिकाऱ्यांनी चांगले काम करून देखील त्यांना डावलण्यात आले आहे. यामुळे पुणे पोलिस दलातच प्रचंड नाराजी असल्याची माहिती पुढे आली आहे. काही पोलिस कर्मचारी, अधिकारी गेल्या काही दिवसांपासून तरंग या कार्यक्रमासाठी तयारी करत होते व रात्रंदिवस ड्युटी करून वाहतूक नियंत्रण करत होते. त्यांच्याबद्दल कोणीही विचार केला नाही. आम्ही सुद्धा पोलिस कर्मचारी, अधिकारी आहोत आमचा विचार कोण करणार? अशी चर्चा सुरू होती.
निमंत्रण पत्रिकेमध्ये दुजाभाव…
पुणे पोलिस धडाकेबाज कामगिरीचे विविध माध्यमे वार्तांकन करत असतात. परंतु, पुणे पोलिस आयुक्तालयाच्या पीआरओकडून तरंग कार्यक्रमाचे पासेस प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देताना दुजाभाव करण्यात आला. निवडक पत्रकारांनाच पासेस देण्यात आले. मग, प्रसारमाध्यमांच्या इतर प्रतिनिधींचे पासेस गेले कोठे? असा प्रश्न उपस्थित झाला. वरिष्ठांकडे हे प्रकरण गेल्यानंतर काही प्रतिनिधींना पासेस देण्यात आले. परंतु, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पीआरोच्या ठिसाळ कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, पुणे शहर पोलिसांच ‘तरंग’ कार्यक्रम उत्कृष्ठपणे पार पडला. पण, प्रथमच या कार्यक्रमाला नाराजीची किनार लागल्याची चर्चा पोलिस दल आणि प्रसारमाध्यमांमध्ये असून, वरिष्ठांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
Loading…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…
The post पुणे पोलिसांच्या ‘तरंग’ कार्यक्रमाला लागली नाराजीची किनार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

