Dailyhunt
राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात मायलेकीचा जागीचा मृत्यू.

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात मायलेकीचा जागीचा मृत्यू.

जालनाः धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळ कार पलटल्याने झालेल्या भीषण अपघातात मायलेकीचा जागीचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संभाजीनगरला राहणारे चव्हाण कुंटुंब हे गावी लातूरला जात असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात नुरवी चव्हाण (वय अडीच वर्षे) आणि रोहिणी चव्हाण (वय 30) यांचा जागेवरच मृत्यू झाला असून, इतर तीन जण गंभीर जखमी आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटली. या अपघातात चव्हाण कुटुंबातील मायलेकीचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि जखमींतील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एअर होस्टेस हर्षिता शर्मा हिचा अपघाती मृत्यू तर मित्र किरकोळ जखमी…

देवाला बळी देण्यासाठी जाताना अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, पण बोकड वाचला…

भीषण अपघात! नांदेडमध्ये मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू…

मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…

सांगलीत भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी…

The post राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात मायलेकीचा जागीचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka