मुंबई : आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस दलातील डीसीपी सुधाकर पठारे यांचे रस्ते अपघातामध्ये निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून पठारे नागरकुरलूकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला.
सुधाकर पठारे हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे.
सुधाकर पठारे यांचे पोस्टिंग सध्या मुंबई पोलीस दलामध्ये पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून केले गेले होते. ट्रेनिंगसाठी सुधाकर पठारे हैदराबादला गेले होते, तेव्हा एका नातेवाईकासह ते ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जात होते आणि हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सुधाकर पठारे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती तेलंगणा पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली आहे.
सुधाकर पठारे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेरमधील वाळवणेचे रहिवासी होते. आयपीएस होण्याआधी सुधाकर पठारे यांनी शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. डॉ. सुधाकर पठारे यांनी एमएससी अॅग्री आणि एलएलबीही केले होते. स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली सुधाकर पठारे जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले, यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली सुधाकर पठारे पोलिस उपअधिक्षक झाले आणि त्यानंतर पोलिस दलामध्येच राहिले. सुधाकर पठारे यांनी आतापर्यंत पोलिस उपअधिक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.
याशिवाय अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून पठारे चंद्रपूर, वसईमध्ये तर पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावतीमध्ये कार्यरत होते. पोलिस उपायुक्त म्हणून सुधाकर पठारे यांनी मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहरमध्ये सेवा बजावली. पोलिस खात्यामध्ये सुधाकर पठारे यांनी संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका लावला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलात त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत.
IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…
पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…
पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू…
पोलिसकाकाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू…
The post मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

