Dailyhunt
सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई.

सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई.

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई केली आहे. कारवाईमध्ये अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून, तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, वडगाव मावळ पो स्टे हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. त्यावरून सहा. पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी 18/03/2024 रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव मधील संस्कृती कॉलनी येथील चंद्रकांत ढोरे यांनी भाड्याने दिलेल्या पत्र्याचे शेड मध्ये 1) मोहम्मद आरिफ मोहम्मद युसुफ सिद्धीकी (वय 25 वर्ष, राहणार संस्कृती कॉलनी, वडगाव, ता.मावळ, जि पुणे) व अन्य एक विधिसंघर्षग्रस्त बालक हे त्यांचे ताब्यात महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा एकूण सुमारे 2,52,000 रू. (अक्षरी दोन लाख बावन्न हजार रूपये) एवढ्या किमतीचा गुटखा बाळगताना मिळून आले होते.

आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत सदरचा माल हा 3)सलमान लियाकत हुसेन सिद्दिकी (वय अं 30 वर्ष, रा.संस्कृती कॉलनी, वडगाव, जिल्हा पुणे, सध्या फरार) याचे मालकीचा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदरचा मुद्दमाल जप्त करून वर नमूद तिन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथे भादवि कलम 328 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई…

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची गुटख्या विरोधात धडक कारवाई…

सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत धडाकेबाज कारवाई…

पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची दारु वाहतूकीवर मोठी कारवाई…

लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka