Dailyhunt
सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची गुटख्या विरोधात धडक कारवाई.

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची गुटख्या विरोधात धडक कारवाई.

पुणे (संदिप कद्रे): सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पो.स्टे हद्दीत अवैध गुटख्याची साठवणूक करणाऱ्या दोन जणांवर धडक कारवाई केली असून, कारवाईमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण व शहर पोलिस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. त्यावरून सहा.पोलिस अधीक्षक श्री सत्यासाई कार्तीक यांनी 22/02/2024 रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये लोणावळा ग्रामीण पो.स्टे. हद्दीत मौजे औंढे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे 1)मच्छिंद्र किसन घनवट, वय 32 वर्ष हा त्याचे मालकीचे खोलीमध्ये, व लोणावळा शहर पो.स्टे. हद्दीत 2) धवल रमेश लुनावत हा त्याचे मालकीचे लूनावत होलसेल स्टोअर्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणावळा, तालुका मावळ, जि पुणे अशा दोन जणांच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा एकूण सुमारे 01,02,209 रू. (अक्षरी एक लाख दोन हजार दोनशे नऊ रूपये) एवढ्या किंमतीचा गुटखा जप्त करून नमूद दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरबाबत अनुक्रमे लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन व लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथे भादवि कलम 328 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर पोलिस करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.हवा बंटी कवडे, मपोहवा आशा कवठेकर, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांचे पथकाने केली आहे.

सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत धडाकेबाज कारवाई…

सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई…

पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची दारु वाहतूकीवर मोठी कारवाई…

लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…

लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची गुटख्या विरोधात धडक कारवाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka