सांगली: एका महिलेनं प्रियकराच्या मदतीने आपल्या प्रेमविवाह केलेल्या नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीच्या विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक म्हणजे पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीने रचला होता. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर तिचं बिंग फुटले. विश्रामबाग पोलिसांनी संशयावरून कसून तपास करत खुनाचा छडा लावला आहे.
आनंद हणमंत सर्जे (वय २८, रा. पोळमळा, सांगली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी व प्रियकरास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सांगली शहरातील एका ब्रँडेड कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करणारा आनंद हणमंत सर्जे (वय २८) हा पत्नी आणि दोन मुलांसह पोळ मळ्यात राहत होता. पहाटे त्यास पत्नी आणि मेहुण्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता मृतदेहाच्या गळ्यावर ओरखडे दिसत होते. पोलिसांनी संशय बळावल्याने अधिक तपास सुरू केला. पत्नीकडे चौकशी केली असता, आनंद यांना मारहाण झाली होती. त्यानंतर घरी झोपल्यानंतर मृत्यू झाल्याचे तिने सांगितलं. परंतु तिच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणला, त्यावेळी खुनाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी पत्नीसह प्रियकरास ताब्यात घेतले, त्यावेळी तिने खुनाची कबुली दिली.
पती आपल्याला दारू पिऊन मारहाण करतो, शिवीगाळ करून सतत त्रास देत होता. याच कारणातून पत्नी आणि तिच्या प्रियकराने (वय २३) हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. पहाटे पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर तिने प्रियकराला बोलावून घेतले. आनंद हणमंत सर्जे यांचे पाय ओढणीने बांधल्यानंतर दोघांनी छातीवर बसून त्याचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…
सांगलीत भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार; तू मागच्याजन्मी नागीन अन् हा नाग…
सांगली हादरली! निर्दयी बापानं 2 मुलींना रात्रभर उलटं टांगलं, लेकीनं पाणी-पाणी म्हणत सोडला जीव…
सांगली! सामूहिक बलात्कार करत मुलीचे कपडेही पळवले; विवस्त्र अवस्थेत चालत राहिली…

