छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार करण्यात आला असून, तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ मोबाईलच्या कॅमेऱ्यात काढून ते फोटो आरोपीने तिच्या आईला पाठवल्याची संतापजनक घटना घडली आहे.
पीडित युवतीने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय शेजुळ असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. सिल्लोड तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका वीस वर्षीय युवतीवर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने युवतीचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओचे चित्रिकरण करून ते तिच्या आईला पाठवले आहेत.
आरोपी दत्तात्रय शेजुळ याच्यासोबत पीडित मुलीची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. दत्तात्रय याने या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिचे फोटो आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये काढले. यानंतर त्याने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर वारंवार अत्याचार केला. मात्र पीडितेनं विरोध केल्यानंतर त्याने आपल्या जवळचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या आईला व्हाट्सअॅपवर पाठवले. तसेच ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित युवतीने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
संतापजनक! दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न अन् संपवलेही…
संतापजनक! चुलत्याने सहा महिन्यांच्या चिमुकलीवर केला बलात्कार…
संतापजनक! बापाने चिमुकलीच्या तोंडात तंबाखू देऊन केली हत्या…
The post संतापजनक! युवतीच्या आईला हॉट्सऍपवरून पाठवला बलात्काराचा व्हिडिओ… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

