Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी बापाने घेतला चिमुकलीचा बळी.

सरपंचपदाची निवडणूक लढवण्यासाठी बापाने घेतला चिमुकलीचा बळी.

नांदेड : सरपंचपदाची निवडणूक लढण्यासाठी एका जन्मदात्या बापाने आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलगंणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पांडुरंग कोंडामंगले या बापाला ताब्यात घेतले आहे.

पांडुरंग कोंडामंगले (वय 32) याला गावातील सरपंचपदाची निवडणूक लढवायची होती. मात्र, महाराष्ट्रात तीन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही, असा नियम आहे. निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून त्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेला आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे. त्याचा बाऱ्हाळी येथे हेअर कटिंगचे दुकान असून त्याला तीन मुलं आहेत. तीन दिवसांपूर्वी पांडुरंग कोंडामंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून सात वर्षाची चिमुकली प्राची कोंडमंगले हिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये जिवंत फेकून दिले. त्यानंतर तो घरी एकटाच परत आला. इकडे कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

निझामाबाद पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत मुलीचे छायाचित्र सोशल मीडियावर आणि आसपासच्या परिसरात प्रसारित केले. मुखेडमधील काही नागरिकांनी मुलीची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पित्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने निवडणुकीसाठी मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. या घटनेनेनंतर विविध चर्चेला उधाण आले आहे. आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याच बोलले जात आहे. तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची त्याची तयारी असल्याची चर्चा होती. पण तीन मुलं असल्याने आपल्या निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरु नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सुरु आहे. हत्येच नेमकं कारण काय याचा तपास पोलिस करत आहे. मात्र, या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! बापाने तीन दिवसांच्या लेकीचा घेतला जीव…

हृदयद्रावक! नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण…

हृदयद्रावक! चिमुकलीने मागितले चॉकलेट अन् दारूड्या बापाने घेतला जीव…

मुख्याध्यापक बापाने नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने मुलीचा घेतला बळी…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka