Dailyhunt
शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर विद्यार्थ्याने रिमोटद्वारे घडला स्फोट, कारण.

शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर विद्यार्थ्याने रिमोटद्वारे घडला स्फोट, कारण.

चंदीगडः एका शाळेतील इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षिकेबरोबर प्रँक करण्याच्या नादात चक्क शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब सदृश्य वस्तू लावून स्फोट घडवून आणला आहे.

विद्यार्थ्यांना हे बॉम्ब सदृश्य स्फोटकं बनवण्याची माहिती युट्यूबवरुन घेतली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सुदैवाने या साऱ्या प्रकारामध्ये शिक्षिकेला कोणतीही इजा झाली नाही. मात्र हे कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेने एका आठवड्यासाठी निलंबित केले आहे. विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षिका विद्यार्थ्यांना एकदा रागावली होती. हाच राग मनात ठेऊन या विद्यार्थ्यांनी युट्यूबवरुन स्फोटकं बनवण्याची माहिती घेतली. एका विद्यार्थ्याने छोट्या बॉम्बेसारख्या आकाराची स्फोटकं शिक्षिकेच्या खुर्ची खाली ठेवली. दुसऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षिका खुर्चीवर बसल्याने रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने या घरी तयार केलल्या बॉम्बेचा स्फोट घडवून आणला.

हरियाणा शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सदर प्रकरणात सहभागी असलेल्या 13 विद्यार्थ्यांना आठवडाभरासाठी शाळेतून निलंबित केले आहे. या विद्यार्थ्यांनी आपण युट्यूबवरील व्हिडीओ पाहून बॉम्ब तयार केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट दिली आणि तेथे पहाणी केली. वर्गातील एकूण 15 विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थ्यांना वर्गात हा असला काहीतरी प्रकार होणार असल्याची कल्पना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचा विचार शाळा प्रशासनाने केला होता. मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी विनाअट माफी मागितली. तसेच मुलं यापुढे असं काहीही करणार नाही असे लेखी आश्वासन या पालकांनी दिलं. शिक्षिकेनंही या विद्यार्थ्यांना माफ केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले नाही.

पोलिसांनी पकडली थार; 23 हजारचे कापले चालान अन् रेकॉर्ड पाहिले तर…

बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई याला कॅलिफोर्नियामधून अटक

Video: एका दुचाकीवर बसले चक्क 8 जण; पोलिस अधिकारी राहिला मोजत…

हृदयद्रावक! मेडिकल कॉलेजला लागलेल्या भीषण आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…

सलूनमध्ये बसून मसाज करणाऱ्या व्यक्तीचा भयानक Video…

The post शिक्षिका खुर्चीवर बसल्यावर विद्यार्थ्याने रिमोटद्वारे घडला स्फोट, कारण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka