Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोलापूर हादरलं! प्रेमप्रकरणातून युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण, अखेर मृत्यू.

सोलापूर हादरलं! प्रेमप्रकरणातून युवकाला झाडाला बांधून बेदम मारहाण, अखेर मृत्यू.

सोलापूर: प्रेमप्रकरणाच्या वादातून एका युवकाला झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा परिसरात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाची आठवडाभर सुरू असणारी मृत्यूशी झुंज अखेर संपली.

अरविंद बाळू मस्के (वय 27) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

मृत अरविंद बाळू मस्के (वय 27, रा. तरटगाव, जि. सोलापूर) याला 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा गावाजवळील हायवेवर आरोपी विशाल वडणे आणि ओंकार वडणे यांनी इतर साथीदारांसह गाठले, अशी तक्रार अरविंदच्या आई रुक्मिणी बाळू मस्के यांनी दिली आहे. आरोपींनी अरविंदला झाडाला बांधून लाकूड, वायर आणि हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाणीत अरविंदच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्या होत्या. नातेवाईकांनी त्याला सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. गेल्या आठवडाभरापासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी तामलवाडी पोलिस ठाण्यात विशाल वडणे आणि ओंकार वडणे यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर नरसप्पा पाटील करत आहेत.

सोलापूर! लग्नानंतर दोनच महिन्यात समजलं पत्नीचं प्रेम प्रकरण अन्…

सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka