Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोलापूर! लग्नानंतर दोनच महिन्यात समजलं पत्नीचं प्रेम प्रकरण अन्.

सोलापूर! लग्नानंतर दोनच महिन्यात समजलं पत्नीचं प्रेम प्रकरण अन्.

सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका युवकाने आपल्या पत्नीच्या आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत ाहेत.

मोहोळ तालुक्यातील यावली गावचा रहिवासी असलेला संजय राजाराम राऊत (वय २६) याचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र, विवाह झाल्यानंतर पत्नीचे आधीपासूनच दुसऱ्या एका युवकावर प्रेम असल्याचे समजले. यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले. त्यातच संजयची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ सदाशिव शिंदे (रा. कोडी, ता. उत्तर सोलापूर) यांनी मिळून संजयला त्रास देण्यास सुरुवात केली.

पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या या संबंधांमुळे संजय त्रासला होता. हे दोघेही संजयला सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप संजयच्या वडिलांनी केला आहे. या सततच्या त्रासामुळे आणि समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने खचून जाऊन संजय याने शुक्रवारी (ता. १०) रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

संजयच्या अचानक जाण्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर मृत संजयचे वडील राजाराम नागनाथ राऊत यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. आपल्या मुलाने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळूनच हे पाऊल उचलल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वडिलांच्या या तक्रारीवरून मोहोळ पोलिसांनी मृत संजयची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ शिंदे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहोळ पोलिस करत आहेत. या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.

कोल्हापूरमध्ये प्रेमविवाहाचा भयानक शेवट; संशयावरून पत्नीला संपवलं अन् मारला मिशीवर ताव…

पुणे! प्रेमविवाह केल्यानंतर नवऱ्याचे अनैतिक संबंध पत्नीला समजले अन्…

लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने घेतला गळफास; पत्नीचे प्रेमसंबंध…

सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…

प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka