Dailyhunt
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे मिळाले लोकेशन.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे मिळाले लोकेशन.

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे.

शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात असून, त्याचे लोकेशन सापडल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी दत्तात्रय गाडेबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचे समोर आले असून, त्याचा प्रेमविवाह झालेला आहे. आरोपीच्या मागावर १३ पोलिस पथकं आहेत. बलात्काराची घटना घडून 48 तास उलटल्यानंतरही पोलिसांनाकाहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर आता पोलिसांना आरोपीचं लोकेशन सापडल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे गुणाट गावापर्यंत आरोपीचा माग काढला होता. मात्र, त्यानंतर आरोपीचं लोकेशन पोलिसांना स्ट्रेस करता आले नाही. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आरोपीवर बक्षीसही जाहीर केले आहे. आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपये दिले जातील, शिवाय माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, अशी घोषणा पोलिसांनी केली. आता 48 तासांनंतर पोलिसांना मोठं यश मिळाले आहे.

आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावाजवळील एका उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एका खबऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे आता पोलिस उसाच्या शेतात आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेत आहेत. पुणे शहर पोलिसांकडून ड्रोनद्वारे उसाचा फड पिंजून काढला जात आहे. याच परिसरातील एका घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिण्यासाठी आला होता, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर आता पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले असून, त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.

दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिरूर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी गाडे याने २०२९ साली कर्ज काढून एक कार घेतली होती. या कारद्वारे तो पुणे अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत होता. दरम्यान, तो एकट्या दुकट्या वृद्ध महिलांना टार्गेट करायचा. त्यांच्या गळ्यात सोनं दिसले तर तो घरून डब्बा घ्यायचा आहे, असे सांगून निर्मनुष्य ठिकाणी गाडी घेऊन जायचा. या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देत महिलांच्या गळ्यातील सोनं काढून घ्यायचा.

याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने आरोपी गाडेला अटकही केली होती. त्यावेळी त्याच्याकडून १२ तोळे सोनं जप्त केले होते. २०२० मध्ये शिरूरजवळील कर्डे घाटात जबरी लूटमार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याला चार ते पाच महिन्यांचा तुरुंगवासही झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मोकाटपणे फिरत होता. आरोपी दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप डीपीवर आमदाराचा फोटो आहे. शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. आरोपी दत्ता गाडे हा गावातील लोकांना उज्जैन येथे महाकाल येथे दर्शनाला घेऊन जायचा. आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावलं अन् माहिती आली समोर…

स्वारगेटच्या बसस्थानकात कंडोम, चादरी अन् दारुच्या बाटल्या…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…

पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…

धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…

संतापजनक! महिलेवर अमानुषपणे बलात्कार अन् शरीरात ठोकले खिळे…

The post स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे मिळाले लोकेशन… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka