Dailyhunt
ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला अपघात; ५ जणांचा मृत्यू.

ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला अपघात; ५ जणांचा मृत्यू.

पुणे : लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसला ताम्हिणी घाटातील एका धबधब्याजवळ अपघात झाला असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बस अपघातात ४० प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील १२ ते १३ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांना बाहेर काढण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

अपघातग्रस्त बस लग्नासाठी महाडहून चाकणला जात होती. यावेळी ४० ते ४५ वऱ्हाडी प्रवास करत होते. आज (शुक्रवार) सकाळी साडेआठ वाजता ही बस ताम्हिणी घाटातून जात असताना, एका धबधब्याजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. काही कळायच्या आत बस ताम्हिणी घाटात मार्गालगत उलटली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, लग्नाला जाणाऱ्या बसला अपघात झाल्याने दुःखाचे सावट पसरले आहे. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. माणगाव पोलिस पुढील तपास करत आहेत. अपघातातून वाचलेल्या प्रवाशांपैकी अनेक जण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्याकडेला मदतीची वाट पाहत बसले होते. या बसमधून बाहेर पडलेले प्रवाशी रस्त्याच्या कडेला बसून होते. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी या मार्गावरुन जाणाऱ्या इतरांनी मदत केली.

मृतांची नावे-
1) संगिता धनंजय जाधव
2) गौरव अशोक दराडे
3) शिल्पा प्रदिप पवार
4) वंदना जाधव
5) अनोळखी पुरुष अजून नावं निश्चित नाही

एलिफंटा बोट दुर्घटनेची थरारक स्टोरी; दुर्घटनेतील मृतांची नावं समोर…

कु्र्ला बस अपघातातील बस चालक मोरेची पत्नी आणि मुलाने सांगितले की…

सांगलीत दुचाकी अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…

IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…

The post ताम्हिणी घाटात वऱ्हाडाच्या बसला अपघात; ५ जणांचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka