Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाहतूक पोलिसांना जमिनीवर पाडून लाथाबुक्यांनी मारहाण.

वाहतूक पोलिसांना जमिनीवर पाडून लाथाबुक्यांनी मारहाण.

पालघरः नालासोपारा येथे ड्राइविंग लायसन्स नसलेल्या वाहन चालकाकडून दोन वाहतूक पोलिसांना जमिनीवर पाडून अक्षरक्ष: लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांना मारहाण करणारे दोघं बापलेक आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

ड्राइविंग लाइसेंस नसलेला मुलगा गाडी चालवत असताना पोलिसांनी त्याला अडवलं आणि लायसन्सआणि इतर कागदपत्रांबद्दल विचारणा केली. यावर चिडून मुलाने आपल्या वडिलांना बोलावून घेतले आणि पोलिसांशी वाद घालण्यास सुरवात केली. यानंतर दोघा बापलेकांनी वाहतूक पोलिसांनाच मारहाण सुरू केली. मंगेश नारकर आणि पार्थ नारकर असे मारहाण करणाऱ्या बापलेकाचे नाव आहेत. पोलिस हवालदार हनुमंत सांगळे आणि पोलिस कॉस्टेबल शेषनारायण आठरे असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसांची नाव आहेत. नालासोपारा पूर्व नागीनदास पाडा सीतारा बेकारीच्या समोर आज (मंगळवार) सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान, वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास तुलिंज पोलिस करत आहेत.

पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न…

Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

पुणे शहरातील पोलिसकाकाचा कर्तव्य बजावताना हृदयविकाराने निधन…

महिला पोलिस हात जोडत म्हणाल्या, मी आईच्या भावनेने रागावले…

The post वाहतूक पोलिसांना जमिनीवर पाडून लाथाबुक्यांनी मारहाण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka