Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच.

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. त्यांच्या बहिणीच्या नवऱ्यानेच ही हत्या केली असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली आहे.

वनराज आंदेकर यांच्या बहिणीने पोलिस ठाण्यातच पोलिसांसमोर धमकी दिली होती. ‘आम्ही तुला जगू देणार नाही, तुला आज पोरं बोलवून ठोकते’, अशा शब्दात धमकावले होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीच म्हणजे रविवारी (ता.१) वनराज यांची हत्या झाली आहे.

वनराज आंदेकर हे रविवारी रात्री साडे आठ वाजता नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात उभा होते. तेव्हा दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी बंदुकीतून पाच राऊंड फायर केले. आंदेकर यांना गोळी लागली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने त्यांच्यावर वार केले. हे वार वर्मी बसल्याने आंदेकर गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

वनराज यांचा खून त्यांच्या सख्ख्या दाजीने केला आहे. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. वनराज यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता.आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिले होते. पण, ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले. त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

सख्ख्या बहिणीनेच वनराज आंदेकर यांना पोलिस ठाण्यात थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. वनराज, ‘आम्ही तुला जगु देणार नाही. तु आमच्यामधे आला आहेस. तु आमचे दुकान पाडण्यास सांगुन आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला आज पोर बोलावुन ठोकतेच.' असे धमकावले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराजची खरोखरच हत्या झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…

पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…

पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka