मुंबईः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे.
जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ महिने २१ दिवस होते. भारत सरकाने त्यांची सुखरूप सुटका केली. पण, लष्करामधून नुकतेच त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सीमेवर उभे राहून देशसेवा करण्याची इच्छा असतानाही आपल्याला बडतर्फ केले आहे. शिवाय, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन पण मिळणार नसल्याने कुटुंब चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. सेवेत पुन्हा दाखल करून घ्यावे, अन्यथा पेन्शन योजना सुरू करावी, अशी चंदू चव्हाण यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. पण, त्यांच्या आंदोलनाकडे कोणीही लक्ष दिले नाही. गेल्या दोन दिवसांपासून ते रस्त्यावरच झोपून आहेत. सोशल मीडियावर त्यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान, चंदू चव्हाण यांना भारतात आणल्यानंतर पुन्हा सेवेत दाखल झाले होते. लष्कराच्या वरिष्ठांकडून सतत आरोप प्रत्यारोप करत त्याच्यावर चौकशी लावल्या गेल्या. भारतात आल्यानंतर चंदू चव्हाण ने आपल्या सैन्य दलातील वरिष्ठांकडे या संदर्भात पत्र व्यवहार देखील केला. मी चुकून पाकिस्तान मध्ये नव्हे तर रागाच्या भरात त्यांचा बदला घेण्यासाठी मी गेलो होतो असे देखील कबूल केले होते, असे चंदू चव्हाण यांनी सांगितले.
चंदू चव्हाण : 88883 60382
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!
पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…
जवान चंदू चव्हाण यांना धुळे महानगर पालिकेत धक्काबुक्की…
कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली…
The post Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

