Dailyhunt
Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्.

Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्.

खनौ (उत्तर प्रदेश) : एका पोलिस ठाण्याच्या प्रभारी महिला निरीक्षकाला तिच्या प्रियकरासह रंगेहात पकडण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

महिला आग्रा पोलिस दलामध्ये पोलिस निरीक्षक आहे. तिचा प्रियकर पवन कुमार हा देखील मुझफ्फरनगरमध्ये पोलिस आहे. दुपारी पवन कुमार त्याची गर्लफ्रेंड असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी आग्रा येथील पोलिस क्वार्टरमध्ये पोहोचला होता. हा प्रकार त्याच्या पत्नीला कळला, त्यानंतर पत्नी आपल्या कुटुंबीयांसह पोलिस क्वार्टरमध्ये पोहोचली. लेडी इन्स्पेक्टरची क्वार्टर रूम आतून बंद होती. दार ठोठावल्यानंतरही दरवाजा न उघडल्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला.

पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी खोलीत प्रवेश केल्यानंतर प्रियकर आणि त्याच्या महिला निरीक्षक प्रेयसीला बाहेर काढले. त्यानंतर पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी प्रथम महिला पोलिस निरीक्षक असलेल्या महिलेला बेदम मारहाण केली आणि नंतर पतीलाही मारहाण केली. मारामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच एसीपी आणि डीसीपी शहरात पोहोचले. पोलिसांनी पत्नी आणि कुटुंबीयांना ताब्यात घेतले आहे.

पोलिस आयुक्त जे. रवींद्र गौर यांच्या आदेशावरून डीसीपी सिटी यांनी महिला निरीक्षकाला निलंबित केले आहे. तसेच निरीक्षकाला मारहाण करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा घटनास्थळी कोण कोण हजर होतं, याचा तपास सुरू आहे. महिला निरीक्षकाला पोलिसांसमोरच मारहाण झाली, यावेळी तिथे उपस्थित पोलिसांवरही कारवाई केली जाईल. त्याचवेळी प्रियकर पोलिस निरीक्षक पवन कुमार विरोधात अहवाल तयार करून मुझफ्फरनगर पोलिस अधिकाऱ्यांना पाठवला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…

पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडले अन्…

नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

वहिनीच्या खोलीत मध्यरात्री घुसताना एकाला दिराने पाहिले अन्…

The post Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka