जयपूर (राजस्थान): एका पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पत्नीने संतापाच्या भरात डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला बेदम मारहाण केली.
डीएसपी विनय चौहान यांची पत्नी मुलांना घेऊन गावी होती. त्यावेळी डीएसपीने आपल्या डॉक्टर प्रेयसीला घरी बोलावल. पण त्यांना कल्पना नसताना अचानक बायकोने दार ठोठवलं. त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. डीएसपीने आपल्या मैत्रिणीला मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. डीएसपी विनय चौहान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जयपूर पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी बस्तीमध्ये वर्ग केला आहे. मात्र, तपासावर परिणाम होऊ नये म्हणून एसपींनी हे प्रकरण सिद्धार्थनगर जिल्ह्यात वर्ग केला आहे.
राजपत्रित महिला डॉक्टर आणि डीएसपी विनय चौहान यांच्यात गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 26 मे रोजी सीओ विनयने त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बस्तीमधील शासकीय निवासस्थानी बोलावले होते. अचानक पत्नी घरी आली आणि रंगेहात पकडल्यानंतर तिचा संयम सुटला अन् तिने मारहाण केली.
दरम्यान संबंधित प्रकरण हे हायप्रोफाईल असल्याने डीजीपी स्तरावरून त्यावर लक्ष ठेवले जात आहे. तपासावर परिणाम होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रकरणाचा तपास एसपी सिद्धार्थनगर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे सध्या एसपी बस्ती गोपाल चौधरी यांनी तात्काळ आरोपी सीओ विनय चौहानला त्यांच्या पदावरून हटवले आहे. तपास अहवालानंतर डीएसपींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…
नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…
सातारामध्ये मित्रासोबत लॉजवर जाताना रंगेहाथ पकडले अन्…
संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…
चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं…
The post पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडले अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

